My Blog List

Sunday, June 30, 2013

सोबतीस तू



हे ना मी तुझ्या सोबत !”

शब्द हे कधी तुझे, तर कधी माझे

पण आपण सांभाळून घेतो एकमेकांना, हे नाही का वेगळे?



उंच आकाशात उडणारा पतंग, 

मला आपल्या नात्याप्रमाणे भासतो

मांजा असतो दोघांच्या हातात, पण तो कधी तू तर कधी मी सावरतो



दोन पावले चालत जातो, 

परत एकदा वळून पाहतो,

सावली माझी सोडून जाते, पण तू माझी असतेस आणि माझ्यातच राहतेस



स्वीकारलेल्या मला आणि साकारलेल्या माझ्या आयुष्याला,

नेहमीच तुझी ओढ असते 

हळव्या हृदयास माझ्या, तुझ्या काळजाची साथ असते



पावसाची सर हळुवार येते,

मला ओलाचिंब करून जाते,

पण मनाचा ओलावा जाणवायला, फक्त तुझ्या मायेची ऊब हवी असते



मी आणि तू , तू आणि मी

कधीच नव्हतो ना वेगळे

पण हे कधी तुला जाणवते कधी मला, हे नाही का वेगळे?

 


© Written By Nutan Ghatge