My Blog List

Saturday, February 18, 2012

शेतकऱ्याची जात

मित्रानो, भारत हा शेतीप्रधान देश आहे. पण सगळ्या जगाला अन्न पुरवणारा  शेतकरी अजूनही मागासलेला आहे. याच शेतकऱ्याच्या जातीवर लिहिलेली ही कविता...
 
सहकाराच्या नावाखाली 
शेतकऱ्याची बरीच खातर,
साखर ज्याच्या मळ्यात त्याला
साखरझोपेचेही अंतर 

ना किंमत कवडीची पिकाला
लाखाचे झाले बारा हजार 
शेतकऱ्याच्या मेहनतीचा
मांडला हा बाजार

कर्जमाफीचा पोकळ दिलासा 
ओसाड पडली शेतीवाडी
सरकारची साजरी दिवाळी
शेतकरी तोडे भाकरी शिळी

सहाव्या वेतन आयोगाची 
हवा लागली दारोदारी
" जय किसान " "जय किसान " नारा
रिकाम्या हाती शेतकरी

जगवले आजवर ज्या कृषिराजाने
पांग फेडाल तुम्ही कोणत्या हाताने
विनंती सरकारला जोडूनी हात
   जगवा हो ही शेतकऱ्याची जात!!!!!
                जगवा हो ही शेतकऱ्याची जात!!!!!             




- नूतन घाटगे