My Blog List

Thursday, March 3, 2011

माझ्यातला तू...

साखरझोपेत मी पहाटे पहाटे,
अन झुळझुळला थंड वारा....
गेला घालून साद कानी,
चेहरा तुझा हसरा....

बावरलेल्या नयनांनी,
पाहता मी दर्पणी,
माझ्याच प्रतिमेत,
दिसलास तू....
हसलास तू....

घेता मी हाती,
प्याला गरम चहाचा,
भिंतीवरच्या चित्रामध्ये,
दिसलास तू....
हसलास तू....

उन्हं कोवळे वाट एकली,
तव पावलांची चाहूल लागली,
पलटून पाहता माझ्या सावलीत,
दिसलास तू....
हसलास तू....

सांजवेळी येता तुझी आठवण,
निसर्गास सारे सांगते गुपित,
सोनेरी लालसर आभाळात,
दिसलास तू....
हसलास तू....

चांदरात्री स्वैर फिरताना,
जाहला हाकेचा आभास,
शीतल चंद्रात त्या.....
दिसलास तू....
हसलास तू....

स्वप्नात भेटण्या तुजला,
जीव माझा व्याकुळला,
मिटताच पापणी हळुवार...
दिसलास तू....
हसलास तू....  

लपंडाव खेळशील किती रे?
असा मला छळशील किती रे?
निरागस प्रश्नास उत्तरण्या,
हसलास तू....
लपलास तू....

- नूतन घाटगे