My Blog List

Wednesday, January 5, 2011

एक कळी

ही कविता आहे एका सुंदर, निरागस मुलगीची जी आपल्या आयुष्यातील कठीण काळात कोमेजून जाते, ती वाट पहाट असते एका आशेच्या किरणेची...आणि एके दिवशी तिला तिचा राजकुमार भेटतो......
या कवितेमध्ये राजकुमार भेटल्यानंतरच्या  त्या मुलीच्या भावना व्यक्त करण्याचा मी प्रयत्न केला आहे...


एक कळी हिरमुसलेली,
कोमेजलेली पानांमागे.....
बहरलेल्या हिरवळीतही,
एकटीच काट्यासंगे.....

चंद्रचांदणे प्रकाशणारे, 
शीतल वारे भिरभिरणारे,
सुंदर पक्षी चिवचिवणारे, 
बावरीस त्या वाटे प्यारे..... 

शुद्ध भाव ना कधी मिळाला,
नाजूकशा त्या गोड कळीला.....
काट्यांचे घाव खूप सोसली,
स्वप्नांमागे धावत राहिली.....   

एके दिवशी पहाट झाली,
कळी राजकुमारा भेटली,
स्वप्नात गुंगली,आनंदात नांदली,
लागल्या प्रेमाच्या चाहुली.....
  
हर्षात बहरली,
कळी लाजली
अन गोड स्वरात राजकुमारा म्हणाली,

"स्वप्नात पाहिले नयन तुझे मी,
 प्रेमानी भरलेले,
 वाट पाहुनी रात्रही ढळली,
 होते भेटीस आसुसले,
 तू येताच बघ पहाट झाली,  
 सुर्यावरही चढली लाली,
  कळी एक मी रुसलेली,
 तुझ्यासाठीच कशी खुलली "

थेंबांसम ओघळले शब्द,
 कळीच्या ओंजळी.....
 गाली गुलाबी फुलली,  
 पाकळी पाकळी.....
 
- नूतन घाटगे

12 comments:

  1. ultimate poem Chiu, I 'understood' the meaning. keep making poems dear.

    ReplyDelete
  2. hey nutan, tu kamal kelis g, kay pan itaki sunder kuni kavita karate ka g. ki kahi bolayala suchatach nahi mala, m sorry shabd nahi majhykade

    ReplyDelete
  3. Thanks harshad... thats very nice complement for me

    ReplyDelete
  4. thanks Harshad... thats really nice complement for me

    ReplyDelete
  5. kavitetle bhav anubhavlyasarkhe vattat.. vatta ki kavita sampuch naye.. ashich ninadat rahavi..manaat... antaparyant... ani achanak cinderella athavte. keep expressing.
    -kamlesh

    ReplyDelete
  6. thanks for the complement Kamlesh.....

    ReplyDelete
  7. very nice .......very cute..........U L T I M A T E.....

    ReplyDelete