My Blog List

Wednesday, December 8, 2010

नात्यातील दुनियादारी...

 मित्रांनो, माझी ही कविता त्या लोकांसाठी आहे जे नात्यातील गोडवा विसरले आहेत, या जगात पाऊल टाकताना, रक्ताची नाती घेऊनच आपण जन्माला येतो...ती नाती परत मिळत नाहीत, मानलेली नाती कितीही असली तरी रक्ताच्या नात्याची ओढ काही वेगळीच असते. म्हणूनच आयुष्यात मागे वळून पाहिले तर तुम्हाला हीच माणसे दिसतील, जी कदाचित अजूनही वाट पहात आहेत तुम्हाला जाणीव होईल याची...तुमच्या एका हास्याची....किंवा कदाचित तुम्हीही वाट पहात असाल अशाच एखाद्या व्यक्तीच्या एका प्रेमळ हाकेची....       



हृदयी आभाळ दाटलेले अन भावना उरी,
न विसरले शब्द विसरली न साथ परि,
अडवली वाट, दिली जीवाची आन तरी,
वाहिला नात्याचा आधार कशी ही दुनियादारी...  

जळाला कण कण तुझा क्रोधाच्या अंगारी,
आठवून पहा नात्याची सकाळ हसरी..
झळाळणारे  तेज आपल्या मनाच्या अंबरी,
तुटणारा तिळ तिळ रे तुला हाक मारी...

स्वार्थापायी सर्व विसरले रक्तच झाले वैरी,
अश्रूंच्या डोहात नाती भिजून गेली सारी,
कठपुतळ्यांच्या खेळात तुझ्या,तुटली बंधनाची दोरी,
फाटली संस्काराची झोळी...देवा!! तूच अमुचा कैवारी....  

                                                           - नूतन घाटगे